नाराजीचे वृत्त चुकीचे: पंकजा मुंडेंचा खुलासा

मुंबई: मराठा उपसमितीच्या बैठकीत मी नाराज होऊन निघून गेल्याचे वृत्त चुकीचे असल्याचा खुलासा महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. नाराज होऊन नाही तर सदस्य नसल्यामुळे मराठा उपसमितीच्या बैठकीसाठी थांबले नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. मराठा आरक्षणाच्या उपसमितीच्या बैठकीत पंकजा मुंडे गेल्या होत्या. त्या बैठकीत सदस्य नसतानाही त्यांनी काही मुद्दे मांडले. हे मुद्दे समितीने स्वीकारले नाही म्हणून नाराज होऊन मुंडे समितीच्या बैठकीतून बाहेर पडल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांनी त्यांची नाराजी कळवली अशी बातमी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती. ही बातमी खोटी असल्याचा खुलासा खुद्द पंकजा मुंडे यांनी केला आहे. त्यादिवशी सभागृहात पंकजा मुंडे आधीपासून उपस्थित होत्या. पण उपसमितीचे सगळे सदस्य सभागृहात जमले. पंकजा मुंडे सदस्य नसल्यामुळे त्या लगेच निघून गेल्या. कोणत्याही प्रकारची नाराजी नव्हती अशी माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान मराठा विधेयक विधानसभेत मंजूर झाले असून विधान परिषदेत सादर करण्यात आले आहे. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2TWeYrT

No comments

Powered by Blogger.