मतदानाच्या दिवशी जन्मला; नाव ठेवलं 'मतदान'

देवास:मतदानाच्या दिवशी जन्मलेल्या बाळाचं नाव चक्क 'मतदान' असं ठेवण्यात आलं आहे. मध्य प्रदेशात काल (बुधवारी) विधानसभा निवडणूक पार पाडली. देवास इथल्या मतदान केंद्रावर मतदारांच्या मोठ्या रांगा होत्या, त्या रांगेत २६ वर्षीय संतोष नावाचा एक तरुणही उभा होता. पण रांगेत उभं असताना त्याचं लक्ष सतत हातातल्या घड्याळाकडं जात होतं. मतदान आटपून त्याला हॉस्पिटल गाठायची घाई होती. त्याची गरोदर पत्नी कोणत्याही क्षणी बाळाला जन्म देऊ शकते त्यामुळं त्याचं हॉस्पिटलमध्ये असणंही गरजेचं होतं.संतोषची पत्नी दाखल असलेलं हॉस्पिटल हे मतदान केंद्रापासून जवळपास १२० किमी इतक्या अंतरावर होतं. असं असतानाही आपलं अमूल्य मत फुकट जाऊ नये सासाठी एका सुजाण नागरिकाची भूमिका त्यानं पार पाडली आणि मतदान करायला आला. काही तास मतदानाच्या रांगेत उभं राहिल्यानंतर संतोषनं मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्यानं हॉस्पिटलकडं धाव घेतली आणि हॉस्पिटल गाठलं. हॉस्पिटल गाठल्यानंतर त्याच्या पत्नीनं एका मुलाला जन्म दिल्याची गोड बातमी त्याला समजली आणि त्याचा आनंद द्विगुणीत झाला. आणि आनंदाच्या भरात त्यानं त्याच्या मुलाचं नाव 'मतदान' असं ठेवलं.'मला वाटतं की प्रत्येक नागरिकानं मतदान करायलाच हवं, तुमच्या एका मतालाही किंमत असते. त्यामुळं मी माझं मत फुकट जाऊ दिलं नाही. मी माझ्या मुलाचं नाव 'मतदान' असं ठेवलं असून मला त्याचा आनंदच आहे. पण त्याच्या यानामुळं भविष्यात त्याला काही अडचणी येऊ नयेत असं मला वाटतं. शाळेत किंवा सरकारी कामकाजात या नावामुळं काही अडचणी येणार असतील तर मी त्याचं नाव बदल्याचा विचार करेन, असं संतोष म्हणाला.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2QpqnS7

No comments

Powered by Blogger.