'अजितदादा, तुमच्याकडून राजकारण शिकलोय'
मुंबई:अजितदादा आम्ही तुमच्याकडूनच राजकारण शिकलो आहोत असा टोला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना लगावला. आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल ते विधानसभेत बोलत होते.एटीआरचे वाचन विधानसभेत सुरू असताना विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. तेव्हा सरकारने किती टक्के आरक्षण देणार, ते न्यायालयीन प्रक्रियेत कसं टिकणार असे प्रश्न विचारले. तसंच राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही केली. मराठा आरक्षणाचा एटीआर आल्यावर भाजप नेत्यांनी विधान भवनाच्या आवारात पेढे वाटून जल्लोष केला होता. तेव्हा अशाप्रकारे जल्लोष करणं बरोबर नाही असं मतही अजित पवारांनी व्यक्त केलं. या सगळ्याचाच उत्तर देताना चंद्रकात पाटील म्हणाले, ' अजितदादा आम्ही राजकारण तुमच्याकडूनच शिकलोय. तेव्हा काहीही झालं तरी आम्ही आरक्षण देऊन राहणारच'. मराठा आरक्षण आज विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करण्यात आले. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही या विधेयकाला पाठिंबा दिला. आता विधी मंडळात हे आरक्षण मंजूर झाले असले तरी राज्यपालांची सही अजून बाकी आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेची याचिका अजूनही उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे आरक्षण मंजूर झाले असले तरी पुढची वाट मात्र अजूनही बिकट आहे. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2FPv6bP
from Maharashtra Times https://ift.tt/2FPv6bP
Post a Comment