हॉटेलात सिलिंडर स्फोट; अग्निशमन जवानाचा अंत
कल्याण:कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क इथं बुधवारी मध्यरात्री एका चायनीजच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. मात्र आग विझवताना अग्निशमन दलातील जगन आंबवले यांचा मृत्यू झाला तर आणखी एक जवान गंभीर जखमी झाला आहे.बुधवारी मध्यरात्री १.१० वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं या परिसरातील विद्युत पुरवठाही काही काळासाठी खंडित करण्यात आला होता. तासाभराच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या पथकाला आग आटोक्यात आणण्यात यश आलं. सिलेंडरचा स्फोट नेमका कसा झाला याचा पोलीस तपास करत असून जगन आंबवले यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2TVrDLK
from Maharashtra Times https://ift.tt/2TVrDLK
Post a Comment