
येत्या ४ डिसेंबरला साजऱ्या होणाऱ्या नौदल दिनासाठी गेट वे ऑफ इंडिया इथं नौदलाच्या जवानांचा सराव सुरू आहे. हा सराव पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. १९७१च्या युद्धात पाकिस्तानवरील विजय हा दरवर्षी नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. या युद्धात भारतीय नौदलाने कराची बंदरावर हल्ला चढवत पाकिस्तानची चार जहाजं उद्ध्वस्त केली. तसंच नौदलाचे इंधन तळही नष्ट केले. भारतीय नौदलाच्या या हल्ल्यात पाकिस्तानचे ५०० सैनिक ठार झाले.
from Maharashtra Times https://ift.tt/2TVQ7on
Post a Comment